मैलाचा दगड

आम्ही ही संस्था जानेवारी 2021 मध्ये एका प्रशिक्षकासह सुरू केली आणि 55 विद्यार्थ्यांसह आमची पहिला लाईव्ह वॉकशॉप आयोजित केला

ह्या एका शिक्षकांबरोबर आम्ही ७००० महिलांपर्यंत पोहोचलो आणि त्यांना कूकिंग स्किल्स शिकवून त्यातील १० टक्के महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तसेच इतर महिलांना सुद्धा ह्याचा बराच फायदा झाल्याचे समाधान मिळाले
हा पहिला मैलाचा दगड होता
आपल्या कंपनीचे सर्व सहा मूल्यांचे आदर्शरित्या पालन करून आमच्या रेश्मा मॅडमने सर्व महिला विद्यार्थ्यांची मने जिकंली
त्यांनी इतके छान आणि सोप्या रीतीने शिकविले की गुगल वर किमान ५० फाईव्ह स्टार रेटिंग आम्हाला मिळाली
हा दुसरा मैलाचा दगड होता

ऑनलाईन कौशल्य वाढवण्याच्या ह्या क्षेत्राचे बारकावे पाहून अगदी पहिल्या दिवसापासून झालेल्या क्लास चे व्हिडिओ आम्ही लाईफ टाइम दिले
ह्या कूकिंग वोर्कशॉप मधून महिला उद्योजिका घडत होत्या हे पाहून आम्ही त्यांना अजून जास्त व्यावसायिक मार्गदर्शन करत गेलो

पुढे दुसऱ्या प्रशिक्षक शीतल मॅडम कंपनीला जॉईन झाल्या
त्यांनी सुद्धा स्टूडेंटची खूप वाहवाही मिळवली आणि त्या सुद्धा विद्यार्थ्यांच्या फेव्हरेट झाल्या
विद्यार्थ्यांच्या कुशलतेला वाढवण्यासाठी तत्पर आणि व्यावसायिक मार्गदर्शनातील बारकावे हे त्याचें महत्वाचे गुण

पुढे सुचित्रा मॅडमने ह्या सर्वाना चारचांद लावले आणि तिथून आम्ही मागे वळून पहिले नाही
बघता बघता आमच्याकडून ३० हजाराहून अधिक महिला विद्यार्थिनी शिकून गेल्या आणि त्यातील बऱ्याच जणींनी आमच्या मार्गदर्शनाखाली घरातूनच छोटासा गृह उद्योग सुरु केला ,
नुकत्याच पँडेमिकने मोडकळीस आलेली मध्यमवर्गीयांची आर्थिक घडी ह्या निमित्ताने उभारणीस आली
होय हा आमचा सर्वात महत्वाचा आणि मोठा मैलाचा दगड ठरला

आणि ह्यामुळेच आमच्या कंपनीचे मिशन ठरले कि
"जगभरातील महिलांना त्यांचे कौशल्य अत्यंत सोयीस्कर आणि परवडणाऱ्या किमतीत वाढवून त्यांचे सक्षमीकरण आणि परिवर्तन करणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास आणि समाजात एक स्वतंत्र अस्तित्व बनण्यास मदत करणे."

ह्याच मिशनवर आम्ही आजन्म काम करू

पुढे आमच्याकडे आरती मॅडम जॉईन झाल्या त्यांनी सुद्धा खूपच छान असे योगदान दिले , त्यांच्या एक्स्पर्ट टिप्स ने त्यांनी सर्वांना मदत केली

आज आम्ही ४ एक्स्पर्ट प्रशिक्षक आणि त्यांना सहयोग करण्यासाठी अजून पाच जणांची अहोरात्र मेहनत करणारी टीम ह्यांनी मिळून एक लाखाहून अधिक महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन व कंपनीचे ६ मूल्ये (ससकामव्याग्रा )(CCDOPP) चे पालन करून महिलांच्या कौशल्य विकासासाठी आणि त्यातून त्यांना सक्षम करून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व समाजात निर्माण करण्यासाठी आम्ही आणि आमची टीम तत्पर आहोत

Read less

Meet our amazing team

Vaibhav Sonawane

Founder & CEO

Harshada Sonawane

Co - Founder

John Doe

Operations Manager

Jeff Anderson

Marketing Head

Choose your courses

yqTYe4G